इचलकरंजी । मागच्या वर्षापासून लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य ते सेलिब्रिटींनीही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत साधेपणाने लग्नसोहळे पार पाडलेत.
अश्यातच आता मराठी चित्रपट आणि सिरीयल मध्ये काम करणारा प्रसिध्द अभिनेता नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. स्टार प्रवाह वरील पुढचं पाऊल या मालिकेतून घराघरात पोहोचलेला समीर म्हणजे अभिनेता संग्राम समेळ याने सोशल मिडीयावर लग्नाचे फोटो पोस्ट केलेत.
संग्राम ने श्रद्धा फाटक हिच्याशी लग्नगाठ बांधली असून हा विवाहसोहळा इचलकरंजी येथे पार पडला. संग्राम समेळच हे दुसरं लग्न असून, त्याने २०१६ मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटील सोबत लग्न केले होते.
रुंजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पल्लवी पाटील आणि संग्राम समेळ यांच्यात मैत्रीचे नाते होते. हळूहळू त्याचे प्रेमात रूपांतर झाले व त्यांनी लग्न केले.
परंतु काही कारणाने हे नातं टिकलं नाही व दोघे विभक्त झाले. संग्रामने अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.