आंतराष्ट्रीय स्तरावरील ‘मार्व्हेल स्टुडिओ’सोबत काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अमेरिकन मार्व्हेल स्टुडिओ ही जगभरात कलाविश्वातील नावाजलेली निर्मिती संस्था आहे. मार्व्हेल स्टुडिओ चे अनेक चित्रपट व मालिका पाहणारे जगभरात करोडो प्रेक्षक आहेत.
याच मार्व्हेल स्टुडिओ निर्मित आपल्या आगामी प्रोजेक्ट साठी फरहान अख्तर हा बँकॉक ला गेला असल्याचे समोर आले आहे. यावर अजूनही फरहान ने त्याच्या आगामी प्रोजेक्ट वर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान फरहान आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाची छाप पडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
फरहान अख्तर हा बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता असून आपल्या भारदस्त अभिनयाच्या शैलीमुळे प्रसिद्ध असून त्याचे जगभरात चाहते आहेत.