आज केंद्र सरकारने वारंवार कोरोना लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्याची मागणी केली जात आहे. लसींच्या अभावी महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरण बंद होण्याच्या मार्गावर आहे.
तसेच महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीत सुद्धा चार दिवस पुरेल, इतकाच लसींचा साठा उपलब्ध आहे. पर्याप्त लसीकरणासाठी दिल्ली सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले सत्येंद्र जैन यांनी दोनवेळा केंद्राला पत्र पाठवल्याची माहिती दिली आहे. राजधानीतील लसीच्या तुटवड्यावर ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन लसीकरण धोरणावर टीका केली.
वैक्सीन की किल्लत पर राघव चड्ढा ने केंद्र को घेरा, कहा- बीजेपी बताए कि पहले भारत जरूरी या पाकिस्तान https://t.co/YPQbzxjpWE #VaccinePolitics
— Pankaj Jain (@PankajJainClick) April 9, 2021
यातच राघव चढ्ढा म्हणाले, ”देशातील आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, उत्तराखंड, ओडिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तेलगंणा या सह सर्व राज्यात लसीकरण येत्या दोन-चार दिवसांत ठप्प होणार आहे. कारण लसींचा तुटवडा भासू लागला आहे.
ते पुढे म्हणाले, देशातील नागरिकांपेक्षा केंद्राला पाकिस्तानातील नागरिक महत्त्वाचे वाटत आहे. देशातील नागरिकांपेक्षा केंद्राला पाकिस्तानातील नागरिक महत्त्वाचे वाटत आहे. म्हणून त्या देशाला कोरोना भारत प्रतिबंधक लस निर्यात करणार असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे.