सोलापूर – गणपती घाट भागात एका महिलेनं सिद्धेशवर तलावात उडी घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे 3 महिन्यापुर्वी याच भागात संबंधीत महिलेच्या मुलानं आत्महत्या केली होती. ही घटना समोर येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.आत्महत्या केलेल्या 40 वर्षीय मृत महिलेचं नाव शारा भीमराव कोळी असल्याचं समोर आलं आहे. त्या सोलापूरमधील जम्मा वस्ती भागात राहत होत्या. शारा कोळी यांच्या मुलानं ३१ डिसेंबर रोजी काही कारणानं गणपती घाट भागातच आत्महत्या केली होती.
बसवराज कोळी हे दर्शनासाठी मंदिरात आले असता त्यांना मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर लगेचच अग्निशमन दल आणि वैद्यकीय मदत कक्षातील कर्मचाऱ्यांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे.मुलानं आत्महत्या केल्यामुळं शारा कोळी यांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचललं आणि मुलानं आत्महत्या केली त्याच ठिकाणी शारा कोळी यांनी आपलं जीवन संपवलं.