कोल्हापूर- सलग सुट्या असूनही कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची दर्शन रांग भक्ताविना ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची भाविकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचं दिसून येत आहे. मंदिर आवारात स्थानिक भविकांचीच तुरळक गर्दी असल्याचं दिसून येत आहे.
रात्रीची संचारबंदी, कोरोना निर्बंधामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. आता कुठं मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ सुरू झाल्यानं व्यावसायिक सुखावले होते, पण आता पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढणारी संख्या आणि प्रशासनाचे कडक निर्बध यामुळे व्यापारी पुन्हा एकदा चांगलेच धास्थावले आहेत.