मुंबई। कोरोनाची दुसरी लाट आली असून संपूर्ण महाराष्ट्रात चिंता वाढली आहे. मुंबईत ही २४ तासात झपाट्याने रुग्ण वाढत आहे. मात्र अजूनही लोक नियमांचे पालन योग्य रीतीने करत नसल्याचे दिसून येत आहे. बऱ्याचवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना महत्त्वाच्या असतात. पण आपण त्याकडे महत्त्वाच्या सूचना म्हणून बघतो का? हे महत्त्वाचे आहे. याच संदर्भात आताच्या घडीला रुग्ण संख्या वाढतेय. झोपडपट्टी, चाळीमध्ये रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत टॉवरमध्ये रुग्ण संख्या जास्त आहे” असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
“टॉवरमध्ये जास्त रुग्णसंख्या असण्यामागे दोन ते तीन कारणे असू शकतात. टॉवरमध्ये सहजतेने कोणाला प्रवेश मिळत नाही. टॉवरमध्ये कोरोना चाचणीसाठी सहजतेने कोणी तयार होत नाही.”
“हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला, तरी काही जण दूध, भाजी आणायला बाहेर जात असतात.त्यामुळे आता पाच रुग्ण जरी आढळले, तरी आम्ही ती सोसायटी सील करत आहोत”असे महापौरांनी सांगितले