बुधवारी नाशिकमध्ये झाकीर हुसेन या रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेननंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र हि घटना ताजी असतानाच अजून एका हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या आयुष्याचा खेळ मांडला आहे. विरारमधील विजय वल्लभ कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. वसई-विरार महापालिकेने कोरोना कंट्रोल रुमकडून एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे.
Maharashtra: Fire breaks out at a COVID Center in Vasai of Palghar district. Affected patients are being shifted to nearby hospitals. Details awaited. pic.twitter.com/QfclEgBvvj
— ANI (@ANI) April 23, 2021
जीवाभावाची व्यक्ती हिरावल्यानं नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. आपल्या जवळच्या व्यक्ती गमावणाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनानं गंभीर आरोप केले आहेत. ज्यावेळी दुर्घटना घडली, त्यावेळी तिथे कर्मचाऱ्यांपैकी कोणीही नव्हती, असा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. कर्मचारी आयसीयूमध्ये उपस्थित असते, तर इतक्या रुग्णांचे प्राण गेले नसते, अशा प्रतिक्रिया नातेवाईकांकडून उमटत आहेत.
#UPDATE 13 people have died so far in fire at COVID hospital in Virar, in Vasai Virar municipal limits, Palghar district
(Earlier visuals)#Maharashtra pic.twitter.com/KHTiSqbLMY
— ANI (@ANI) April 23, 2021
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यानी प्रशासनाला दिले आहेत. तसेच रूग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रूग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची तर जखमींच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.