सोलापूर। सोलापूर मधील विडी घरकुल आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांवर गोरख विटकर या इसमाने हल्ला केला आहे. आपल्या आईचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह का दिला याचा जाब विचारण्यासाठी त्याने आरोग्य केंद्रामध्ये धिंगाणा घातला. दरम्यान रुग्णसेविकांनी गोरख विटकर या इसमाने बलात्काराची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे.
त्याचबरोबर संबंधित इसमाने आरोग्यकेंद्रामध्ये लोखंडी बाकडे फेकून हाणण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. संबंधित आरोग्यसेविकांना पोलीस कॉन्स्टेबलचं संरक्षण आहे. मात्र, पोलिसांच्या समोरच गोरख विटकर या इसमाने हा धिंगाणा केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ही प्रश्न उपस्थित होत आहे. सदर घटनेची तक्रार पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरु आहे.