मुंबई – राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत चालले आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत असल्याचे दिसत आहे. झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे याच पार्श्वभूमीवर मुंबईलोकल पुन्हा बंद होण्याचे संकेत राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याचे संकेत दिले आहेत. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने लोकल बंद होण्याची शक्यता आहे.
लोकल पूर्ण बंद करावी किंवा मागच्या वेळेसारखे लोकल सेवेला जे निर्बंध घातले होते ते पुन्हा घालावेत; यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे. त्यावर लवकरच विचार केला जाईल,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर अजून कडक निर्बंध लागून सर्वसामान्य लोकांची लाईफलाईन पुन्हा बंद होणार का याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.