- थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओचा आपल्या विचित्र वागणुकीमुळे कायम चर्चेत असतात. सध्या सोशल मिडियावर त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. यात ओचा पत्रकारांवर चक्क सॅनिटीयझर शिंपडत असल्याचं दिसतयं. यामुळे ओचा यांच्यावर जगभरात टीका होत आहे .
ओचा हे दर आठवड्याला पत्रकार परिषद घेतात. या कार्यक्रमात संबोधित करताना ओचा यांना एक प्रश्न विचारण्यात आला आणि त्या प्रश्नावर चिडून ओचा यांनी पत्रकारांवर सॅनिटायझरच शिंपडलं. त्यांच्या अशा वागण्यावरुन राजकिय वर्तुळातही अनेक चर्चा सुरु आहेत.
At the end of today’s weekly post-cabinet meeting presser, PM @prayutofficial was asked yet again about specific names in the next cabinet reshuffle – instead he sprays the entire first row of the press with alcohol spray… pic.twitter.com/w6mDluxQMU
— Saksith Saiyasombut (@SaksithCNA) March 9, 2021
ह्या आधीही पंतप्रधान प्रयुत चान अनेक कार्यक्रमाच्या वेळी अशाप्रकारचे वर्तन केले आहे. या आधी अशाच एका पत्रकार परिषदेच्या वेळी पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी कॅमेरामनच्या अंगावर केळ्याचे साल फेकले. त्यांच्या अशा वागणुकीमुळे पत्रकारही पत्रकार परिषदेत जाणं टाळत असतात.
थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओचा हे थायलंडच्या पूर्व सैनिक कमांडर होते. त्यानंतर २०१४ साली ते थायलंडमध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक आलेली सत्ता बरखास्त केली आणि त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. या आधीही थायलंडचे पंतप्रधान ओचा यांनी अनेक कार्यक्रमाच्या वेळी अशाप्रकारचे वर्तन केले आहे.