देशात कोरोनाचा कहर वाढतचं असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच कोरोनाचा सामना करण्यासाठी इंग्लडचे पंतप्रधान जॉन्सन यांनी अर्थव्यवस्था लाॅकडाऊननंतर पुन्हा सुरू करण्यांतर्गत मोठी योजनेची घोषणा केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सूचना दिली आहे की, त्यांनी आठवड्यातून दोनदा कोरोना चाचणी करावी.
आराेग्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, प्रत्येकाला ९ एप्रिलपासून आठवड्यात दोनदा मोफत रॅपिड कोरोना चाचणी करता येईल. लोकांना जवळचे औषधांचे दुकान, कम्युनिटी सेंटर व होम डिलिव्हरी सेवेद्वारे मोफत चाचणी किट उपलब्ध केली जाईल. जॉन्सन ‘कोविड स्टेटस सर्टिफिकेशन’ योजना जाहीर करणार आहेत.लोकांच्या प्रतिसादामुळे वेगाने चाचणी करून आणि कोविड स्टेटस सर्टिफिकेशन सिस्टिमद्वारे महामारीला नियंत्रित केले जाऊ शकतो असा विश्वास तेथील सरकारला आहे.