सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेसोबत तातडीची बैठक घेत वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजचा होणारा तुटवडा, रेमडेसिव्हिरचा पुरवठा न होणे, बेड्सची कमतरता या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
पंढरपूर निवडणूकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने बैठकी दरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागले . त्यामुळे आचारसंहिता मागे घेण्याची मागणी कारण्या संबंधीचे पत्र निवडणूक आयोगाकडे देण्यात येईल. असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.