मुंबई : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्याच्या आणि देशाच्या चिंतेत भर घालणारी आहे. याच मुद्द्यावरून आज पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
देशातील परिस्थिती गंभीर आहे. स्पष्ट सांगायचं तर हाताबाहेर गेली आहे. पण देशाच्या राज्यकर्त्यांनी करोना गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. आज बंगालमध्ये जे शक्तिप्रदर्शनं सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं तिकडे करोना नाही. याचं भयावह चित्र नंतर दिसेल असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आज प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज देशात कोरोना संसर्गाशी युद्ध सुरु आहे. फडणवीस यांना माहिती असेल सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी करोनामुळे आजारी आहे. सर्व लोक करोनाशी झूंज देत आहे. महाराष्ट्राचे म्हणून एकत्र आलं पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधकांनी हे डोक्यातून काढलं पाहिजे की, आपल्या विरोधकांना करोना होईल, आपल्याला होणार नाही असे त्यांनी बोलून दाखविले होते.
देशातील परिस्थिती गंभीर आहे. स्पष्ट सांगायचं तर हाताबाहेर गेली आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सर्वांची बैठक घेऊन गांभीर्य समजावून सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेत की, लॉकडाउनशिवाय पर्याय नाही. ही स्थिती संपूर्ण देशाचीच आहे. देशपातळीवर असा निर्णय घेण्याबद्दल पावलं टाकली जात आहेत का?, असं चित्र मला दिसतंय असे राऊत म्हणाले.