मुंबई : शौचालये म्हंटल की गडद रंग, अस्वच्छता, सर्वत्र दुर्गंधी आणि दुरवस्था तसेच जवळून गेल्यावर पटकन तोंडावर रुमाल हेच चित्र चटकन डोळ्यासमोर उभे राहते. मात्र शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी बांधलेल्या आणि रंगवलेल्या आगळ्या-वेगळ्या शौचालयाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच नगरसेवक सचिन पडवळ वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी चांगलेच प्रभागात नाही तर मुंबईत चांगलेच परिचित आहेत,
शिवडी येथे बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या अत्यंत बिकट अवस्थेचे चित्र बदलण्याचा प्रयत्न नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे. शौचालये देखील सुंदर आणि कलात्मक पद्धतीने उभारता येऊ शकतात, याचे उत्तर उदाहरण पडवळ यांच्या संकल्पनेतून समोर आले आहे.
शिवडी, कोळसा बंदर येथील प्रभाग क्रमांक २०६ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांच्या प्रयत्नाने तळमजला प्लस एक असे एकमजली शौचालय उभारण्यात पडवळ यांच्या नगरसेवक फंडातून बांधण्यात आले आहे. तसेच यामध्ये पुरुषांबरोबरच महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
शौचालयाचे वैशिष्ट्य म्हणजे ते आकर्षक पद्धतीने रंगविण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच शौचालयात २४ तास पाण्याची सुविधा करून देण्यात आली आहे.