नवी मुंबई:- गाडीला पुढे जायला जागा मिळाली नाही, म्हणून समोर उभ्या असलेल्या कारला मागे उभ्या असलेल्या दुचाकी स्वाराने हॉर्न वाजवून गाडी पुढे घेण्याची विनंती केली. मात्र, पुढील वाहन स्वाराकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. अनेक वेळा हॉर्न वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने मागील दुचाकीस्वाराने हॉर्न वाजवणे सुरूच ठेवले.
हे पाहून समोर कारमध्ये बसलेल्या तिघांनी गाडीच्या बाहेर येऊन दुचाकी स्वाराला जबर मारहाण केली. या माराहाणीमध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे.गौरेश चिकलीकर असं सदर दुचाकीस्वार तरूणाचं नाव आहे. सदरचा प्रकार हा नवी मुंबईतील सानपाडा याठिकाणी घडला आहे.
या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पुराव्यानुसार मारहाण करणाऱ्या तिघांवर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.यात एका महिलेचाही समावेश आहे.दरम्यान पोलीसांकडून अजूनही आरोपींचा शोध सुरूच आहे. मात्र फक्त हॉर्न वाजवला म्हणून जबर मारहाण केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा:-
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आ.रवी राणा यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन