मुंबई । परमबीर सिंग यांची बदली करून हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईचे पोलिस आयुक्तपद सोपवण्यात आले आहे. परमबीर सिंग यांची बदली होमगार्ड विभागात करण्यात आली आहे.
हेमंत नगराळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना म्हणाले की, “एकाने चूक केली म्हणून संपूर्ण पोलीस दल चुकीचे नसते. मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात आहेत. समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नियुक्ती केली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांंचे सहकार्य लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे.” असे आवाहन नगराळे यांनी केले आहे.
सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले आहे.
तसेच पोलिसांनीही असे कृत्य करू नये जेणेकरून पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागेल. अन्यथा कडक कारवाई करू. असा इशाराही नगराळे यांनी यावेळी दिला आहे.