संपूर्ण देशभसरात वर्णने हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. त्यात मोट्या संख्याने रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्राच्या अडचणीत वाढ करताना दिसत आहे. आज भारताबाहेरील पत्रकारांनी देशातील भयावह कोरोना संसर्गाचे चित्र आपल्या वृत्तपत्रात मांडले आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“आत्मनिर्भर होण्याचा उद्देश आहे. कोणीही आता आपल्या मदतीला येणार नाही, पंतप्रधान सुद्धा नाहीत. देशातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि केंद्र सरकार आता त्याची जबाबदारी राज्यांवर ढकलत आहे. वैज्ञानिकांनी वारंवार सूचना देऊनही सुरुवातील कोरोनाचा धोका ओळखायला मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
पुढे मोदी आणि शहा यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणतात की, भारत हा जगातील पहिलाच देश आहे की ज्या देशात विशेषज्ञ आणि तज्ज्ञांच्या मदतीशिवाय, त्यांच्या सल्ल्याशिवाय कोरोना विरोधात लढा लढला जातोय. लोकांचा जीव वाचवण्यासाठी, योग्य नियोजनासाठी आणि सकारात्मक निर्णयासाठी या तज्ज्ञांची मते आणि सूचना या अत्यंत महत्वाच्या असताना भारतात त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. देशातील कोरोनाची स्थिती बिघडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांतील प्रचारात व्यस्त राहिले असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. या प्रचाराच्या दरम्यान पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री कुठेही मास्कचा वापर करताना दिसले नाहीत अशीही टीका त्यांनी केली.