आपल्यातल्या प्रत्येकाला निसर्ग सौंदर्य खुणावत असते.अनेकजण देशविदेशात पर्यटक म्हणून जाणे पसंत करतात.समुद्र किनारे, डोंगर-दऱ्या, जंगल याचे प्रत्येकाला अप्रूप असतं.जागतिक अनेक पर्यटन स्थळे हे तेथील असलेल्या वैशिष्ट्य पूर्ण वेगळेपणामुळे ओळखले जाते.असे एक जगाचे लक्ष्य वेधून घेणारे ठिकाण म्हणजे गीथहॉर्न.
नेदरलँड मधील गीथहॉर्न हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले असले तरीही या गावात पायी चालण्यासाठी मातीचा किंवा सिमेंट काँक्रेट रस्ता नसून हे ठिकाण जलमय आहे, व येथील गावकरी बोटीने प्रवास करतात हे या ठिकाणचे वैशिष्ट्य असून गीथहॉर्न जगातील अनेक पर्यटन ठिकाणांमध्ये वेगळं ठरतं.
नेदरलँडमधील गीथहॉर्न हे नैऋत्य नेदरलँडमध्येअसून लोकप्रिय डच पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते तसेच वेनिस ऑफ नेदरलँड म्हणूनही गीथहॉर्नची ख्याती आहे.
या गावात पादचारी रस्ता नसल्याने येथे पारंपरिक पद्धतीने बोटीने दळण वळण केले जाते.परंतु आता हळूहळू येथील भाग विकसित होत असून काही ठिकाणी सायलिंग केली जाते.
१९५८ डच चित्रपट दिग्दर्शक बॅन
हॅनस्ट्र्राने फॅन फेयर नावाचा पहिला चित्रपटाचे चित्रीकरण हे गीथहॉर्न मध्ये केले होते. या चित्रपटामुळे गीथहॉर्न हे गाव राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले.