कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने आता पुढील १५ दिवस राज्यात कडकडीत लॉकडाऊन लागणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार आहेत. मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काहीवेळातच लॉकडाऊन बाबतच्या नियमावली मुख्यमंत्री सांगणार आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन मध्ये जिल्हाबंदी करणार असून नागरिकांना प्रवासादरम्यान पास असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना लोकल प्रवास करता येणार नाही. असे सांगितले जाते आहे.