८६ वर्षापूर्वी म्हणजेच ४ जुलै १९३४ ला हे जग सोडून गेलेली, दोन वेळा विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारी, आपल्या वैयक्तिक जीवनात अनेक संघर्षाला, अपमानाला तोंड देऊन प्रत्येक ठिकाणी पहिलं असण्याचा मान मिळवणारी, निराशेला आशेची किनार देणारी, दोन मूलद्रव्यांचा शोध लावणारी, विज्ञाननिष्ठ वैज्ञानिक मेरी क्युरी.
प्रथम शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या मेरीचा विवाह पेरी क्युरी या वैज्ञानिकाशी झाला. हेन्री बेक्वेरेल या शास्त्रज्ञाला नुकतेच युरेनियम या धातूतून क्ष-किरणांप्रमाणे अज्ञात किरण बाहेर पडताना आढळले. या किरणांना ‘बेक्वेरेल किरण’ असे नाव दिले गेले. मेरी क्युरीला संशोधनात असे दिसून आले की, शुद्ध युरेनियमपेक्षा ‘पिचब्लेंड’ या युरेनियमच्या संयुगातून अधिक प्रमाणात किरणोत्सर्ग होतो.
पिचब्लेंड या संयुगातून किरणोत्सर्ग करणारे द्रव्य वेगळे करण्यात मेरीला यश आल्यावर असे लक्षात आले की, शुद्ध युरेनियमपेक्षा या नवीन द्रव्यातून चारशे पट किरणोत्सर्ग होतोय. या मूलभूत द्रव्याला मेरीने पोलंडवरून ‘पोलोनियम’ हे नाव दिले. त्या पुढच्या संशोधनात मेरीला पोलोनियमपेक्षाही अधिक किरणोत्सर्ग करणारे रेडियम हे द्रव्य सापडले.
युरेनियमच्या १६०० पटीहून अधिक किरणोत्सर्ग करणाऱ्या रेडियमचे पुढे शरीर विज्ञान क्षेत्राला मोठे योगदान मिळाले आहे. विशेष म्हणजे एवढे मौलिक संशोधन करून मेरी आणि पेरी क्युरी यांची आíथक परिस्थिती त्या काळात जेमतेम असूनही त्यांना सापडलेल्या पोलोनियम आणि रेडियम या धातूंचे पेटंट न घेता त्यावर अधिक संशोधन करणेच त्यांनी महत्त्वाचे मानले. प्रथम शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या मेरीचा विवाह पेरी क्युरी या वैज्ञानिकाशी झाला.
तिच्या या सर्व कामामधून १९०३ मध्ये तिला डॉक्टरेट ही पदवी मिळाली. तिथेही तिला पहिलं असण्याचा मान मिळाला कारण सायन्स मध्ये डॉक्टरेट मिळवणारीही ती पहिली महिला वैज्ञानिक ठरली. त्याच वर्षी मेरीला पेर आणि बेक्वरेल यांच्याबरोबर रेडिओऍक्टिव्हिटीसाठी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं. पण पुन्हा तेच, गुणवत्ता असूनही वाट्याला नाकारलेपण. ती महिला शास्त्रज्ञ असल्याची अडचण. इतर शास्त्रज्ञानाही तोपर्यंत महिला शास्त्रज्ञ असल्याचं रुचत नव्हत.
नोबेल समितीने पेर आणि बेक्वरेल या दोघांचीच नाव पुढं केली पण मग पेरने नोबेल समितीला समजावून सांगितल की हे मूळ काम मेरीचच आहे. आजारपणामुळे मेरी आणि पेर पुरस्कार घ्यायला गेले नाहीत. नोबेलची मिळालेली रक्कम तिने पोलंड मधील गरीब लोकांना दान केली.
मेरीला दोन मुली होत्या. मोठी इरिन तर लहान ईवा. मुलगी इरिन आणि जावई फ्रेड्रिक जोलीयट यांना आर्टिफिशल रेडिओऍक्टिव्हिटी या शोधाबद्दल १९३४ सालच नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं पण ते पाहायला मेरी नव्हती. खरतर ज्यावेळेस मेरी रेडिओऍक्टिव्हिटी वर काम करत होती त्यावेळेस त्याचे दुष्परिणाम कोणालाच माहीत नव्हते.
मेरी तर त्या मूलद्रव्यांच्या टेस्ट ट्यूब खिशात घेऊन फिरत, रात्री झोपताना बाजूला कपाटाच्या ड्रावर मध्येही ठेवत. शेवटी व्ह्यायच तेच झाल. मेरीला रेडिओऍक्टिव्हिटीच्या अतिवापरामुळे ल्युकेमिया कॅन्सर झाला. त्यात ती मरण पावली.
मेरीने केलेल्या तिच्या कामाचा उपयोग आज न्यूक्लिअर एनर्जी तसेच अनेक कॅन्सरच्या उपचारासाठी करण्यात येतो. तिने ४८३ शोधनिबंध प्रसिद्ध केले तर ३४ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट दिली. मेरी युरोपमधील पहिली महिला होती जिने सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली होती.