काही दिवसांपासून टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या लग्नाची चर्चासोशल मीडियावर जोरदार चालू आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन हिच्यासोबत जसप्रीत लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. अनुपमनाची आई सुनिता यांनी या अफवा असल्याचे स्पष्ट केले.
पण आता जसप्रीत बुमराह आणि मॉडेल संजन गणेशन हे 14-15 मार्चला गोव्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. त्या दोघांकडून अजून कोणतीच माहिती आलेली नाही परंतु सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरूवात झाली आहे.
Jasprit Bumrah will be marrying Sanjana Ganesan on 14th-15th March. Congratulations to both of them. pic.twitter.com/xd7u2CYr44
— Abhinav (@DeadlyYorkers) March 9, 2021
संजना गणेशन स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. संजनाने सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओत संजना भारतीय गोलंदाजाची मुलाखत घेत आहे.