भारतात तसेच जगभरात दरवर्षी लाखो करोडो चित्रपट प्रदर्शित होतात. जागतिक सर्वेक्षणानुसार वर्षाला जास्तीत जास्त चित्रपट प्रदर्शित होण्यास भारत अग्रेसर आहे.
सध्याच्या डिजिटल युगात थ्रीडी सारखे सिनेमे सर्वानाच्याच मनात रुंजी घालताना दिसतात. अशा सिनेमाचा जन्म कसा झाला ठाऊक आहे का?
छायाचित्रणाच्या अदभूत यशानंतर पॅरिस मध्ये
१)आरायल ऑफ अ ट्रेन (आगगाडी स्टेशवर येतेय)
२)गार्डनर विथ अ व्हॉटरिंग होस (माळी पाईपाने बागेला पाणी घालतोय)
३) ब्रेकफास्ट सिन (न्याहारीची वेळ)
अश्या एक एक मिनिटांचे चलतचित्र ऑगस्ट ल्यूमिए आणि लुई ल्यूमिए या बंधूंनी बनविले. २८ डिसेंम्बर १८९५ मध्ये सिनेमाचा जन्म झाला. असे इतिहासकारांनी नोंद केली आहे.
लुई ल्युमिए आणि ऑगस्ट ल्यूमिए यांनी चलतचित्रांना सिनेमॅटोग्राफ असे नाव देऊन पेटंट केले व त्यांच्या या शब्दावरून चलतचित्रांना सिनेमा हे नाव देण्यात आले.
ल्युमिए बंधूंना चलतचित्रांचे जनक असेही म्हटले जाते.
सिनेमाच्या या खेळाला सुरुवातीला पन्नास प्रेक्षक ही नव्हते. पण काही दिवसांनी सिनेमा पाहण्यासाठी लांब लचक रांगा लागू लागल्या.
प्रेक्षकांचा हा प्रतिसाद थक्क करणारा होता. पॅरिस मध्ये २८ डिसेंबर १८९५ मध्ये व्यावसायिक चलतचित्रांचे प्रदर्शन करण्याचे श्रेय ल्युमिए बंधूंना जाते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धा पर्यंत अनेक रोजच्या घटनांवर सिनेमे तयार झाले.
या एकसुरी पणाला छेद देण्याचं काम फ्रान्सच्या जोर्सेस मेलीस याने केले. ल्युमिए बंधूंच्या सिनेमांचे खेळ त्याने पाहिले होते. मूवी कॅमेरा निर्माण करण्याची त्याला इच्छा झाली.
तो कॅमेराच्या प्रेमात पडला पण ल्युमिए बंधूनी कॅमेरा विकत घ्यायला नकार दिला. त्यानंतर त्याने स्वतःच्या स्टुडियोत कॅमेरा बनवला व शेकडो फिल्म्स तयार केले.
अ ट्रिप ऑफ टू मुन हा त्याचा १४ मिनिटाचा सिनेमा विज्ञान काल्पनिक होता. हा सिनेमा कादंबरीवर आधारित असून त्याने टेक्नॉलॉजी चा वापर करून बनविला असून तो लोकप्रिय ठरला.
चित्रपटातून कथा सांगणारा तो पहिला चित्रपट कर्ता ठरला. आणि सिनेमा विश्वाच्या प्रवासात नवे वळण येत गेले.