मुंबई : राज्यात मोठया प्रमाणात बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्ससह रेमडेसिविर इंजेक्शन, लस आदींचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. परिणामी करोना संसर्ग झालेल्या रूग्णांचे हाल सुरू आहेत. कोलमडत असलेली आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी राज्यसरकारकडून वेळोवेळी केंद्र सरकारकडे मदत देखील मागितली जात आहे. तर, या मुद्यावरून अनेकदा राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.
त्यातच शनिवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राने राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा हा महाराष्ट्राला करण्यात आला असल्याचा छातीठोक दावा केला होता. यावरून आज काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आकडेवारी सादर करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे. कृपया खोटे बोलणे थांबवा. असं सावंत म्हणाले आहेत.
या संदर्भात ते ट्विट करून म्हणता की, “देवेंद्र फडणवीस, आपण जी यादी दाखवून पंतप्रधान मोदींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मे.टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे.” असा सचिन सावंत यांनी आरोप केला आहे.
महाराष्ट्र को सब ऑक्सीजन मोदी जी दे रहे हैं यह सफेद झूठ
फडणवीसजी, झूठ बोलकर मोदीजी को श्रेय देने का काम बंद कीजिए। pic.twitter.com/KN354JVLFc— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 26, 2021