नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.या गळतीत तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला आहे.नाशिकमधील झाकीर हुसेन या रुग्णालयात ही घटना घडल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट केलं ते म्हणाले, नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री @ChhaganCBhujbal जी आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 21, 2021
नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली व या दुर्घटनेत २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. व यानंतर आता रुग्णांच्या नातेवाईकांमध्य अक्रोशाचं वातावरण तयार झालं आहे.