कल्याण। कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने लावलेल्या निर्बंधाविरोधात कल्याण डोंबिवलीमधील व्यापारी आणि दुकानदार रस्त्यावर उतरल्याचे चित्र आज पाहायला मिळालं. महापालिकेने दुकानबंद केल्याने निषेध व्यक्त करत हजारो व्यापारी आज रस्त्यावर उतरले होते.
कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी व रविवारी असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे डोंबिवलीतील दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी पालिकासमोर निषेध व्यक्त करत डोंबिवली पालिकाऑफिस समोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान व्यापाऱ्यांकडून रास्ता रोकोही करण्यात आला.यावेळी सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.