बीड- बीड जिल्ह्यातील खामगाव- धारूर – पंढरपूर रस्त्यावर अपघात झाला आहे. धारूरच्या घाटात वळणा ६० ते ७० फूट खोल दरीत ट्रक कोसळला आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर येत आहे. या अपघातात ट्रकचालकाचा चिरडून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारूर शहरापासून जवळ असलेल्या घाटात आज दुपारी १२ च्या सुमारास माजलगावकडे जाणारा ट्रक हा घाटातून जात होता. वळणावरून पुढे जाताना अचानक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक थेट कठडा तोडून ७० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चिरडून चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक बाहेर काढण्याच काम सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेखा धस यांनी दिली.