कोरोना विषाणूने पुन्हा एकदा टोके वर काढले आहे. देशात दिवसाला २ लाखाहून अधिक रुग्ण सापडत आहेत. हजारोंच्या पट्टीने लोक आपला जीव गमवत आहेत. गेले एक वर्ष संपूर्ण जग होरपळून निघाले आहे.अनेक गोष्टीचा तुटवडा निर्माण होत आहे. कोणाला बेड मिळत नाहीय तर कोणाला ऑक्सिजन मिळत नाहीय.
अशातच दबंग चित्रपटातील खलनायकाने पुन्हा मदतीसाठी हात पुढे केला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेच्या परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रुग्णांच्या मदतीसाठी धावून आला आहे. मध्यप्रदेशमधील इंदूर येथे त्याने रुग्णालयांना मदत केली आहे. याच संदर्भात एक व्हिडीओ ट्विटरवर समोर आला आहे.
इस विकट समस्या में जहां एक ओर जनप्रतिनिधि चुनाव प्रचार अन्य कार्यों में व्यस्थ है, वही दूसरी ओर जन नायक सोनू सूद द्वारा इंदौर शहर को बड़ी मदद दी गई। समस्त इंदौर वासियों की ओर से सह्रदय धन्यवाद!????❣️???? @SonuSood pic.twitter.com/A7ZmrTl4iT
— Lokesh Kumar Gupta (@Lkg1255) April 15, 2021
मला समजले की इंदोर मध्ये रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यासाठी माझ्याकडून दहा ऑक्सिजन जनरेटर इंदूरला पाठवत आहे. मी सर्व लोकांना विनंती करतो की, सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे ज्याद्वारे आपण या महामारीतून बाहेर पडू. मला पूर्ण विश्वास आहे की आपण एकमेकांना सहकार्य करत या मोठ्या समस्येतून बाहेर पडू, असे सोनूने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.