मुंबई दि.१३ – सध्या राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रसार वाढत आहेत. यानंतर अनेक नेते, मंत्री, दिग्गजांनी लस घेतल्याचे समोर येत आहे. या महामारीपासून लढण्यासाठी आपल्या शिस्तबद्धतेसाठी ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी शनिवारी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून फोटोही शेअर केला आहे.
“आज मी जे.जे. रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. सर्वजण लवकरच ही लस घेतील अशी अशा करतो. या कठिण काळात सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली असून त्यांचा अभिमान आहे,” असा संदेशही तुकाराम मुंढे यांनी आपल्या फोटोसह लिहिला आहे. “कोरोना प्रतिबंधात्मक लसीत्या विकासाठी हातभार लावून आणि लसीकरणासाठी इतर देशांना सहाय्य करून भारतानं मोलाची कामगिरी बजावली आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.