नवी दिल्ली । बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात २४ जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. यावेळी करण्यात आलेल्या हल्यात ७०० नक्षलवाद्यांच्या जमावाने जवांनावर बेझूट गोळीबार केला. या नक्षलवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून नक्षलवादी विरोधात एकच संतापाची लाट पसरली आहे.
दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगडमध्ये दाखल झाले असून त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री अमित शहा आता उपचार घेत असलेल्या जवानांची रायपूरमध्ये भेट घेत चौकशी केली आहे. त्यापाठोपाठ जगदलपूर, बिजापूर आणि रायपूरचा दौरा करणार आहेत. त्यानंतर एका उच्चस्तरीय बैठकीतही गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले आहेत.
या बैठकीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह आयबी, सीआरपीएफ आणि राज्य पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत. यावेळी या प्रकरणातील अधिक माहिती आणि पुढील रणणितीवर चर्चा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
काल झालेल्या या भ्याड नक्षलवादी हल्ल्याची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा दिल्लीत दाखल झाले. तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्या संपर्कात राहत प्रत्येक घडामोडीची माहिती घेत होते. तसेच सीआरपीएफच्या डीजींनाही तात्काळ बिजापूरमध्ये दाखल होण्याचे निर्देश दिले. यात नक्षलवाद्यांच्याविरोधात लढा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने नवी रणनिती तयार केली आहे.
On behalf of PM, & Central govt & the country, I pay tributes to the security personnel who lost their lives in the Naxal attack. The country will always remember their sacrifice for taking the fight against Naxals to a decisive turn: Union Home Minister Amit Shah in Jagdalpur pic.twitter.com/udeqci127C
— ANI (@ANI) April 5, 2021