राज्यात कोरोना निघून जायचे नाव घेईना आणि त्यातच आता हवामान खात्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्याच्या तपमानात कमालीची वाढ झाली असून मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये नागरिकांना वाढणाऱ्या उष्णतेला सामोरे जावे लागत आहे.
त्यातच आता कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले आहे.
फेब्रुवारी महिन्यात विदर्भ,मराठवाडा कोकणासह मध्यमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट होऊन शेतीचे नुकसान झाले. यातच आता पुन्हा ९ ते ११ एप्रिल मध्ये राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असून शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ होत आहे.
त्याचप्रमाणे मुंबई व उपनगरातील काही भागांमध्ये तुरळक पावसाच्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला असून सद्या मुंबई व उपनगरात ढगाळ वातावरण दिसत आहे.
त्याचप्रमाणे देशातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसणार आहेत.