उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सध्या ते विलगीकरणात असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर मी करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पूर्णपणे पालन करत आहे”. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्हर्च्युअल माध्यमातून आपण सर्व कामं करत असल्याचं सांगितलं आहे.
प्रदेश सरकार की सभी गतिविधियां सामान्य रूप से संचालित हो रही हैं।
इस बीच जो लोग भी मेरे संपर्क में आएं हैं वह अपनी जांच अवश्य करा लें और एहतियात बरतें।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 14, 2021
एकाच दिवशी उत्तर प्रदेशमधील दोन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सर्वाना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसापूर्वी योगी आदित्यनाथ हे लालजी टण्डन यांच्या जयंती कार्यक्रमात गेले होते. व या कार्यक्रमाचे आयोजन मंत्री आशुतोष टण्डन यांनी केले होते. व तेही कोरोना पॉसिटीव्ह आले आहेत.