खाजगीकरणाच्या विरोधात वडवणीकरांनी आवळली वज्रमूठ
खाजगीकरण कंत्राटीकरण विरोधी जनआंदोलन स्थापन

वडवणी (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाकडून सध्या खाजगीकरण करण्याचा सपाटा सुरू आहे. नोकऱ्याचं कंत्राटीकरण आणि शाळांचं खाजगीकरण करून दारिद्र्य आणि अज्ञानाच्या खाईमध्ये ह्या पिढीला लोटण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. त्याला विरोध म्हणून वडवणी तालुक्यातील सुजाण नागरिक, पदवीधर, युवक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी एकत्र येऊन नोकऱ्याच कंत्राटीकरण आणि जिल्हा परिषद शाळाच खाजगीकरण करण्याचा जी.आर. रद्द करण्यासाठी वडवणी करांनी आवळली वज्रमूठ
सविस्तर वृत्त असे की सध्या महाराष्ट्र राज्य मध्ये आरक्षणाचे वारे वाहू लागले असता या धावपळीतच महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय करणाऱ्या नोकऱ्याचं कंत्राटीकरण आणि जिल्हा परिषद शाळांचं खाजगीकरण करण्याचे दोन जीआर काढून थेट आरक्षणालाच कात्री लावण्याचं काम सरकारकडून केल जात आहे. या जी.आर. मुळे महाराष्ट्रातील तमाम युवकांना तूट पुंजा मानधनावर काम करावे लागणार आहे. त्यांना सेवेची शाश्वती सुद्धा नाही तसेच ग्रामीण भागातल्या दुर्गम भागातल्या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्यामुळे अशा शाळा बंद होणार आहे. त्यामुळे तेही शिक्षणापासून वंचित राहणार आहेत तसेच शाळांचं खाजगीकरण करून विविध कंपन्यांना शाळा चालवायला देण्यात येणार आहेत. त्यामुळे कंपन्यांचा उद्देश शिक्षण देणे हा नसून नफा कमवणे हा असतो त्यामुळे मूळ शिक्षणाचा उद्देश ही बाजूला राहणार आहे
शासनमान्य दारूच्या दुकानाची संख्या मात्र वाढत आहे आणि सरकार शाळांची संख्या मात्र कमी होत आहे, सरकारी शाळांमध्ये गोरगरिबांची मुले शिकतात त्यांचे शिक्षण बंद करण्याचा सरकारचा डाव आहे. तो वेळीच हाणून पाडण्यासाठी वडवणी तालुक्यातील शिक्षणप्रेमी, पालक, विद्यार्थी, शेतकरी, शिक्षक आणि युवक यांनी एकत्र येऊन बचतगट भवन मध्ये खाजगीकरण – कंत्राटीकरण विरोधी जनआंदोलन स्थापना केले आहे. यासाठी लहू खारगे आणि किरण ढोले या युवकांनी पुढाकार घेतला आहे.