मुंबई । अभिनेत्री वनिता खरातने नुकततेच इन्स्टाग्रामवर बोल्ड लूक मधले फोटो पोस्ट केले असून सोशल मीडियावर त्यांना तुफान पसंती मिळत आहे. वनिताने डीप नेकचा जॅकेट घातला आहे तसेच गळ्यात मोठी चेन घातली असून तिचा मेकअप आणि घायाळ करणारी नजर असलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईकचा वर्षाव केला आहे.
वर्षाच्या सुरुवातीला न्यूड फोटोशूट करत i love my body म्हणजेच स्वतः च्या शरिराचा न्यूनगंड न बाळगता प्रेम करा असे कॅप्शन देत तिने फोटो पोस्ट केले होते त्यावर सोशल मीडियावर तिला सकारात्मक पाठींबा देखील मिळाला तसेच अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या या धाडसाचे कौतुक ही केले होते.
यानंतर आता तिच्या या बोल्ड लूक ने नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. दरम्यान, अभिनेत्री वनिता खरात ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून आपल्या विनोदाच्या कौशल्याने प्रेक्षकांना कायम हसवत असते. तसेच तिने कबीर सिंग या चित्रपटामधून शाहिद कपूर सोबत स्क्रीन शेयर केली आहे.