मुंबई : राज्यात एकीकडे सर्व सामान्य नागरिकांना कोरोनाची लागण होत असताना दुसरीकडे राजकीय पुढारी आणि सेलिब्रिटींना सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याचे चित्रं दिसून येत आहे. त्यात काहीच दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार आणि विकी कौशिक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
मात्र आता अभिनेत्री कतरीना कैफ हिला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे की, ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करुन घ्यावी’ असे तिने म्हटले आहे.
दरम्यान सोमवारी कतरिना कैफचा मित्र अभिनेता विकी कौशलनेही इन्स्टाग्राम अकाऊंट पोस्टद्वारे करोना झाल्याचे सांगितले होते. त्यांनी लिहिलं होते की, संपूर्ण काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे असं त्याने पोस्टमध्ये लिहिले होते.