नाशिक पाठोपाठ आता विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अचानक झालेल्या एसीच्या स्फोटामुळे १३ जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेलं वक्तव्य असंवेदनशील असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.विरार हॉस्पिटलमध्येमधील दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नाही असं असंवेदनशील वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे.
राज्य शासनाकडून संबंधित दुर्घटनेची योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच मृतांच्या नागरिकांना ५ लाखाची मदत करण्यात येईल. तसेच स्ट्रक्टचरल ऑडिट न केलेल्या बेजबाबदार सदस्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
विरार दुर्घनेवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटूंबाला ५ लाख तर जखमीं रूग्णांच्या कुटूंबाला १ लाखाची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. विरार दुर्घटनेत मरण पावलेल्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले