पंढरपूर : आमदार भरत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्र्वादीने भालके यांचे पुत्र भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाकडून समाधान अवताडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यात राष्ट्रवादी आणि भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी या निवडणुकीसाठी प्रचाराला हजेरी लावल्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे.
त्यात आता सकाळपासून या निवडणुकीसाठी मतदानाला सुरवात झालेली आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच दुसरीकडे मतदानं केंद्रावर sanitizer फवारणी दर तसाला केली जात आहे. राज्यात कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे कोरोनाच्या गडद संकटात पंढरपूर आणि मंगळवेढा मतदान केंद्रावर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे.
तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना सुद्धा आपला हक्क बजावता येणार आहे. यासाठी शेवटच्या तासाला कोरोनाग्रस्त रुग्णांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीला कोण बाजी मारणार यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.