आपण रोज जेवणात डाळ, भात, भाजी, चपाती अशा पदार्थांचा आस्वाद घेत असतो परंतु रोज रोज खाऊन कधीतरी काहीतरी वेगळा पदार्थ बनवायचा मन होत. जेवणात काहीतरी वेगळे पदार्थ असले की जेवताना मज्जा व सोबतच घरच्यांचा मूडही एकदम ठीक होतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काहीतरी वेगळा आणि सोपा पदार्थ घेऊन आलो आहोत. ज्याने तुमच्या जेवणाला अजून स्वादिष्ट बनवेल.
लाल भोपळ्याचे रायते
लाल भोपळ्याचे रायते बनवण्यासाठी लागणारे साहित्य
भोपळा- २०० ग्राम
दही- ३५० ग्राम
तिखट-चवीप्रमाणे
जीरा पावडर- १/२ चमचा
कोथिंबीर-बारीक चिरलेली
मीठ- चवीप्रमाणे
तेल- २ चमचे
बनवण्याची कृती
आधी भोपळा सोलून त्यातील बिया काढून किसून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. यात भोपळा आणि मीठ घाला. तीन-चार मिनिट शिजू घ्या.
नंतर गॅस बंद करुन हे गार होऊ द्या. आता एका भांड्यात दही, मीठ, जीरपूड, कोथिंबीर टाकून मिसळून घ्या. यात शिजलेला भोपळा घाला. गार सर्व्ह करा. अशी साधा सोपा पदार्थ नक्की करून बघा.