सध्याची पिढी ही आपल्या फिटनेसबाबत जास्तच जागरूक असते. परंतु सद्यस्थितीत लागलेल्या लॉकडाऊनमुळे बाहेर जाऊन वर्कआउट शक्य नाही. त्यामुळे अनेकांना वजन वाढीच्या समस्येने ग्रासले आहे.
यावर उपाय म्हणून घरच्याघरी व्यायाम करणे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याने अनेकांनी हा पर्याय अवलंबला आहे. अलीकडच्या काळात स्लिम होण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला असून व्यायामासोबतच अनेकांनी वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी ला प्राधान्य दिले आहे.
आपल्या न्यूट्रिशनल आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स व्हॅल्यूमुळे ग्रीन टी ना केवळ वजन कमी करून लठ्ठपणा तर कमी करतेच सोबतच आतड्यांना हेल्दीही ठेवते. वजन कमी करणे यासाठी ग्रीन टी चा वापर केला जातो त्याचप्रमाणे, चेहऱ्यावर तेज येण्यासाठी अनेक मॉडेल्स सकाळी उठल्यावर ग्रीन टी मिसळलेल्या थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ करतात.
मेटाबॉलिज्ममुळे आपल्या खाण्यात जे ही पदार्थ येतात त्याचे पचन होण्यास शरीराला मदत होते. हे मेटाबॉलिज्मचे प्रमाण ग्रीन टीच्या सेवनाने वाढले जाते व त्यामुळे पोटामध्ये अतिरिक्त फॅट्स न राहता वजन कमी होण्यास मदत मिळते.
परंतु ग्रीन टी व्यतिरिक्त योग्य आहार, व्यायाम करणे शिवाय भरपूर पाणी पिण्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे ग्रीन टी सोबतच योग्य डाएट फोल्लो करणे आवश्यक असते.
युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलॅंड मेडिकल सेंटरच्या एका रिपोर्टनुसार, वजन कमी करण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टीचे सेवन करणे पुरेसे आहे. जेवल्यानंतर ग्रीन टी चे सेवन करावे. परंतु ग्रीन टी मध्ये अल्काईन नावाचा घटक असतो. जर तुमचे पोट अतिसंवेदनशील असेल तर सकाळी आणि संध्याकाळी असे ग्रीन टिचे सेवन केल्याने शरीरावर सकारात्मक फरक दिसुन येतो.
ग्रीन टी करताना पाणी अतिरिक्त गरम करू नये असे केल्यास त्यातील कॅटेचिन्स जळून जातात, त्यामुळे हलक्या कोमट पाण्यामध्ये ग्रीन टीचे पाने मिसळल्याने हा चहा झटपट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.