संपूर्ण देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. तसेच रुग्णसंख्या सुद्धा झपाटयाने वाढताना दिसत आहे. या वाढत असलेल्या रुग्णसंख्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. आज रुग्णाच्या सेवेसाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या संकटातही जीवावर उदार होऊन रुग्णसेवा पुरवत आहेत. त्यावर आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शायरीच्या माध्यमातून ट्विट करत या आरोग्य क्षेत्रातील फ्रंटलाइन योद्ध्यांना सलाम ठोकला आहे.
आनंद महिंद्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक शायरी पोस्ट करून फ्रंट लाइनवर सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेवकांच्या कामाचे कौतुक केले आहे. “वो कोई और चिराग होते है जो हवाओं से बुझ जाते हैं…. हमने तो जलने का हुनर भी तूफानों से सीखा है…” असं ट्वीट महिंद्रा यांनी केलं आहे. त्यासोबतच खाली “अथकपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या आपल्या फ्रंटलाईन हिरोंचे आभार आणि कौतुक!”, असं देखील ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
राज्यात लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करण्यापूर्वी थेट परखड मत मांडून आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावत काही सूचना केल्या होत्या. “लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं ट्वीट त्यांनी केले होते.
“ वो कोई और चिराग होते हैं जो हवाओं से बुझ जाते हैं…
हमने तो जलने का हुनर भी तूफ़ानों से सीखा है…”Gratitude and appreciation for our untiring medical frontline heroes..
— anand mahindra (@anandmahindra) April 27, 2021