जळगाव- राज्यात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.याचं पार्श्वभूमीवर जळगांव जिल्ह्यातील पहूर ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिक्षेत आहे.
सद्यस्थितीत कोरोना काळ सुरू असून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय भांडणात पहूर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर उघड्यावर पडण्याची शक्यता दिसत आहे. डॉ .जितेंद्र वानखेडे यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण यांच्याकडून ऑर्डर मिळाली होती. मात्र, जिल्हापरिषदेेकडून अशी कोणत्याही प्रकारची ऑर्डर मिळालेली नाही,असे सांगण्यात आले. तसेच मागील ३ ते ४ महिन्याचा पगार देखील अजून पर्यंत तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याला मिळालेला नाही.त्यामुळे येथील कोविड सेंटर शेवटच्या घटका मोजत होते.
याचदरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पहूर ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत रुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी यांची ऑर्डर काढून देण्याचे आश्वासन दिले आहे.