सोलापूर- मागील काही दिवसापासून सोलापूर शहर परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मा. आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरातील ३६ हॉस्पिटल हे कोविडसाठी घेण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त २२० हॉस्पिटल हे नॉन कोविड हॉस्पिटल आहेत. अशा हॉस्पिटल यांनी समर्पित कोरोना हॉस्पिटलची संख्या पालिका प्रशासनाकडून वाढविण्यात येत आहे.
ज्या हॉस्पिटलना समर्पित कोरोना हॉस्पिटल करण्याची तयारी आहे. अशांनी आमच्याकडे अर्ज करावा त्यांना त्याच दिवशी समर्पित कोरोना हॉस्पिटलची मान्यता देण्याचे प्रयोजन करण्यात येईल.
याशिवाय सोलापुरातील श्रीमंत व्यक्तींना कोरोनाचा प्रादुर्भावाची काही लक्षणे आढळून आल्यास समर्पित कोविड रुग्णालयात जाऊन एखादा बेड आरक्षित करू नये. अशा श्रीमंत व्यक्तीं करता खाजगी हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्याची मान्यता देण्यात येईल.शहरातील श्रीमंत व्यक्तींनी आपले मोठेपण दाखवून समर्पित कोरोना रुग्णालयात गरजू गरीब रुग्णांवर उपचार करण्यास संधी उपलब्ध करून द्यावी असेही आवाहन पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे.