नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णवाढत झपाट्याने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चाललेल्या महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आता त्या पाठवत आणखी एका राज्याचे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
दिल्लीत सुद्धा महाराष्ट्र पाठोपाठ वीकेण्ड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवरील यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत. तर चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.
तसेच बाहेर जेवण्याला बंदी असून होम डिलिव्हरीची परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना निर्बंधाचं पालन करावं लागेल. कर्फ्यूमध्ये लग्नासाठी जाणाऱ्यांना ई-पास दिला जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. ‘हे सर्व निर्बंध तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहेत. यामुळे थोडी अडचण होईल पण करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध गरजेचे आहेत,’ असं अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.