सध्या सर्वत्रच आपण कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यापासून नकारात्मक गोष्टी ऐकत आहोत, बघत आहोत मात्र अशातच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. एका ९७ वर्षीच्या आजीने कोरोनावर मात केलीय. या आजीच सर्वत्र कौतुक होत आहे. ही आजी मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये राहते. ९७ वर्षांच्या आजींचे नाव शांतीबाई दूबे आहे. १९२५ मध्ये शांतीबाई यांचा जन्म रामनवमीच्याच दिवशी झाला होता. उज्जैन येथिल रहिवासी असलेल्या शांताबाईंना कोरोनाच्यामुळे ८० टक्के पर्यंत संसर्ग झाला. ४ एप्रिलला त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांना इंदूरच्या इंडेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गंभीर स्थितीमुळे ऑक्सिजनवर ठेवले होते. तरीसुद्धा इच्छाशक्ती आणि जिद्दीने त्यांनी कोरोनावर मात केली.
त्यांच्या परिवाराने दिलेल्या माहितीनुसार ४ एप्रिल रोजी त्यांची तब्येत बिघडली होती. ब्लड प्रेशर वाढल्यानंतर त्यांना उज्जैनच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण प्रकृती सुधारली नाही. सिटी स्कॅनमध्ये फुफ्फुसात ८० टक्के संसर्ग दिसून आला. त्यानंतर त्याला इंदूरला नेण्यात आले. अशा स्थितीतही आजींनी कोरोनाला हरवल्यामुळे कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. खरतर आजींचे कौतुक कितीही केल तरी कमीचं आहे. कोरोनाचा संकट असूनही डगमगून न जाता त्यांनी कोरोनावर मात केली आहे.