पश्चिमबंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. त्यात मतदानाची पुढची तारीख येत असताना सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालू केले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
त्यात तृणमूलच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला आणि पंतप्रधान मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे. निवडणुका आल्या की पाकिस्तानशी युद्ध करतात आणि पुलवामाला स्वतःच्या सैन्याचा जीव घेतात असा टोला ममता दीदींनी जाहीर सभेत पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
दरम्यान पश्चिमबंगालमध्ये २९४ विधानसभा मतदार संघांपैकी ६० मतदार संघात मतदान झाले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपात चांगलेच खटकलेले दिसून येत आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ममता दीदींवर टीका करताना म्हटले की, ममता दीदी जर वारणसीतून उभ्या राहिल्या तर त्यांना साधू-संत भेटतील आणि त्यांना जय श्रीरामच नारा ऐकावा लागेल मात्र त्यांना जय श्रीराम,च्या घोषणेवरून चीड येते असा टोला मोदींनी लगावला होता.