भारत हा कृषिप्रधान देश म्हणून जितका ओळखला जातो तितकेच भारतातील निसर्ग सौंदर्य, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, लोकसंस्कृती हे परदेशी पाहुण्यांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू मानले जातात.विशेषतः भारतातील उत्तरेकडील राज्य हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण मानले जाते.जम्मू-काश्मीर प्रमाणे दार्जिलिंग, मणिपूर, आसाम, सिक्कीम,अरुणाचल प्रदेश या राज्यांत भ्रमंती करण्यासाठी भारतीय तसेच जगभरातील पर्यटक पसंती देतात.
यातील एक मुख्य ठिकाण म्हणजे अरुणाचल प्रदेश मधील तवांग होय. अरुणाचल प्रदेश मधील तवांग हे शहर हिरव्यागार वनराई आणि उंच पहाडी डोंगरात वसलेले आहे.तवांग व आसपासच्याच्या परिसरात शेती हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. भारताचे नंदनवन म्हणून जम्मू- काश्मीरची ओळख असली तरी तवांगचे सौंदर्य त्याहून नक्कीच कमी नाही.
१६८०-८१ मध्ये तवांगमधील उंच डोंगरावर बौद्ध मठाची स्थापना करण्यात आली. हे मठ जगातील सर्वांत मोठ्या बौद्ध मठांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानले जाते. त्यामुळे धार्मिक दृष्ट्या तवांग हे कायम आकर्षणाचा भाग राहिलेला आहे.विशेष म्हणजे या बौद्ध मठातील बुद्धांची मूर्ती ही तिबेट वरून आणण्यात असून असून भव्यदिव्य मूर्ती सुमारे३०० वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते.
अरुणाचल प्रदेश आणि मुख्यतः तवांग हे उंच पहाडी भागात असून तालावांनी वेढेलेलं तवांग शहर आहे. तवांगच्या जवळच तिबेट च्या सीमा लागतात. इथल्या आकर्षक निसर्ग सौंदर्यामुळे चीन तवांग मिळवण्यासाठी नेहमीच कुरापती करत असतो.त्यामुळे तवांग हे शहर पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणाचा एक भाग म्हणून कायम चर्चेत असतो.
डोकलाम वादावरून भारत चीन यांच्यात पुन्हा जे शत्रुत्व निर्माण झाले त्याचे मुख्य कारण तवांग असल्याचे म्हटले जाते. अरुणाचल प्रदेश आणि तवांगवर कब्जा करण्याचा हेतू चीनकायमच बाळगून आहे.
१५व्या शतकातील सहाव्या दलाई दामा यांचे जन्मस्थान म्हणूनही तवांगला ओळखले जाते. तसेच अरुणाचल प्रदेशाला लागूनच तिबेटची सीमा असल्याने हा तिबेटमध्येच येतो असे चीन वारंवार सांगत असतो.
पहाडी प्रदेशात वसलेले तवांग काहीही करून मिळवण्याकरिता चीन भारताला अक्साई चीन काही भाग देण्याचे जाहिर केले.परंतु चीन सरकारच्या या निर्णयाला खुद्द चिनी नागरीकांकडून कडाडून विरोध झाला, शिवाय अक्साई चीनचा भाग नापीक असल्याने त्याचा भारताला काहीही उपयोग नाही.
अरुणाचल प्रदेशच्या सीमालगत भागात भारतीय सैन्य नैसर्गिक आपत्तीशी सामना करत चीनच्या कुरपतींना सडेतोड उत्तर देत आहे.त्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि तवांगवर कब्जा करण्यास चीनच्या पदरात आजवर अपयशच आले आहे.