नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात जोरदार लसीकरण मोहिमेला सुरवात झालेली आहे. तसेच अनेक नजरचुकांमुळे घडणाऱ्या घटनांचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यात नर्सने बोलता-बोलता महिलेला दोनदा कोरोनाची लस टोचली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
प्रकरण असे की, कमलेश देवी नावाची महिला याठिकाणी लस घेण्यासाठी गेली. यादरम्यान फोनमध्ये व्यग्र असणाऱ्या नर्सनं महिलेला एकच्याऐवजी दोनवेळा कोरोना लस दिली. महिलेनं तक्रार केल्यानंतर नर्सनं आपली चूक मान्यही केली. मात्र, महिलेच्या कुटुंबीयांनी यानंतर एकच गोंधळ घातला.
कमलेश देवी यांनी सांगितलं, कि नर्स आपल्या मोबाईलवरुन कोणासोबत तरी बोलत होती. तिनं फोनवर बोलत बोलतच मला लस दिली. मी तिथंच बसून राहिले आणि तिनंदेखील मला तिथून उठण्यास सांगितलं नाही. फोनवर बोलताना ती हे विसरली की तिनं आधीही मला एकदा लस दिली आहे आणि तिनं मला पुन्हा एकदा लस दिली.
दोनवेळा लस टोचल्यानंतर कमलेश देवींनी विचारणा केली, की लस दोनवेळा दिली जाते का? यावर नर्सने नाही एकदाच दिली जाते, असं उत्तर दिलं. यानंतर महिलेनं सांगितलं, की तुम्ही मला दोनवेळा लस दिली आहे. यानंतर उलट नर्सच महिलेवर ओरडायला लागली आणि तू उठून का गेली नाही, असा प्रश्न करू लागली. यानंतर महिलेने सांगितले, की तुम्ही मला जाण्यासाठी सांगितने नाही. मला याची माहिती नव्हती की एक लस घ्यायची की दोन. असे उत्तर कमलेश देवी ह्यांनी दिले होते.