राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण विविध उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येतेय. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत महाविकास आघाडीतील मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहेत .
संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे.निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही असं सांगतानाच आताच निर्णय घेतला तर आपण महिनाभरात कोरोनावर नियंत्रण मिळवू,असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आज राज्यात लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना जो काही निर्णय लागेल तो सर्वासाठी समान असेल व संपूर्ण महाराष्ट्रात एकच निर्णय लागू होणार असल्याचे सांगितले तर दुसरीकडे लॉकडाऊन होणार का? मुख्यमंत्री काय निर्णय घेणार? कि निर्बंध अजून कडक लागणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलय.