मुंबई- राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक पोस्ट लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्याला सलाम केलाय. राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केले तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला. त्यानंतर, इतरही विरोधकांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड खंबीर पाठीराखे बनून उभारले आहेत.
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत..
त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्याचे आव्हाड यांनी कौतुक केले आहे.जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या कार्याला सलाम केला आहे. ते म्हणाले आहेत की, “पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वत:च्या ह्रदयात अनेक स्टेन्स असतानादेखील ज्या पद्दतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत… त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!”.