मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. आज राज्यात १५ दिवसाचा लॉकडाऊन लावून सुद्धा मोठया प्रमाणात रुग्णवाढीचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. त्यात आता आरोग्य यंत्रणा सुद्धा कमी पडू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांनी एकमुखाने घेतला होता.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी आज संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज्यात पूर्ण लॉकडाऊन लावाला लागेल, अशी माहिती दिली आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांना बेड मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन लावावाच लागेल लवकरच त्यासंबंधी गाइडलाइन जारी करण्यात येतील असे त्यांनी काळ बोलून दाखविले होते.
बुधवारी रात्री आठपासून राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा, अशी विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आता मुख्यमंत्री लॉकडाऊनसंदर्भातील शेवटचा निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री आज रात्री आठनंतर लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.