आज जागतिक आरोग्य दिन, संपूर्ण जग कोरोनाच्या संकटापुढे हतबल झालं असतानाच काही छोट्या गोष्टी करून आपण स्वतःला कोरोनापासून दूर ठेवू शकतो.
दरवर्षी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन सात एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन ‘म्हणून दिवस साजरा करते. जगभरातील लोकांना आरोग्याप्रती जागरूक करण्यासाठी आणि आरोग्यच सर्व काही आहे, हे समजावण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
लोकांच्या आरोग्यविषयक समस्येचे निरसन करणे ह्या संघटनेचा मुख्य हेतू आहे. ह्या मध्ये मानसिक,शारीरिक अवस्था समजून आरोग्याचा विचार करणे समायोजीत आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे, त्यांना आरोग्यविषयक वैद्यकीय मदत पुरवणे आदी कामे केली जातात. ७ एप्रिल हा या संघटनेचा स्थापना दिवस असतो जो जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रत्येक वर्षी संघटनेतर्फे एका विषयाची निवड केली जाते. त्या संदर्भात चर्चा, परिसंवाद, पथनाट्य केले जाते आणि रोगाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली जाते. ह्या वर्षी आपणास सर्वाना माहिती आहे की कोरोना व्हायरसने थैमान मांडला आहे. भारतातच काय संपूर्ण विश्व या आजाराने त्रस्त आहे. जगभरात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.अजून ही हजारोंच्या संख्येने लोक या आजाराने ग्रासित आहेत. सम्पूर्ण देश या आजाराशी लढत आहे. यासाठी सर्व डॉक्टर,सरकार,वैज्ञानिक आणि जागतिक आरोग्य संघटना काम करत आहे.
“BULDING A FAIRER HEALTHIER WORLD”
प्रत्येक वर्षी जगभरातील लोकांच्या विशिष्ट आरोग्याच्या विषयाकडे लक्ष वेधले जाते.म्हणुनच सन २०२१ साठी जागतिक आरोग्य संघटनेने Bulding A fairer,Healthier World अर्थात “एक सुंदर, आरोग्यदायी जग बनविणे” ही संकल्पना/घोषवाक्य ठेवले आहे.
काय आहे इतिहास?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली. १९५० रोजी पहिला जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. १९४८ मध्ये सात एप्रिल रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनची स्थापना झाली. ज्यावेळी या संघटनेची पहिली सभा घेण्यात आली. त्यावेळी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.
कशी घ्याल आपल्या आरोग्याची काळजी?
कोणत्याही आजारासाठी उपचार घेण्यापेक्षा आरोग्याची आधीपासूनच काळजी घेणं उत्तम असतं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने कोरोना व्हायरसचा जागतिक महामारी म्हणून घोषित केलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोना व्हायरसवर औषध व लस उपलब्ध झाली आहे.या व्हायरसने जगभरात शेकडो लोकांचा बळी घेतला आहे. पण या घातक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काही उपाय आपण नक्कीच करू शकतो. थोडस मनावर नियंत्रण ठेवलं आणि प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन केलं तर आपण नक्कीच कोरोनाला नक्कीच हरवू शकतो. एवढचं नाहीतर काही गोष्टिंचं पालन करून आपण इतरही आजारांपासून दूर राहून आपलं आरोग्य जपू शकतो.
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय :
1. स्वच्छतेची काळजी घ्या.
2. स्वच्छ पाण्याचा वापर करा.3.भरपूर पाणी प्या.
4. उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचं सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे जास्त मीठ असणारे आणि जास्त गोड पदार्थ कमी प्रमाणात खा.गरजेपेक्षा जास्त खाणं टाळा. तसेच जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
5. निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करा.
6. शांत झोप घ्या.
आरोग्यासाठी हेल्थ इन्श्योरन्स आवश्यक..
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात घर, ऑफिस आणि कामाचा ताण, यामुळे अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्षं होतं. अशातच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आधीपासूनच तयार राहणे गरजेचे आहे.म्हणुनच प्रत्येकाचा आरोग्य विमा असायलाच हवा..
संकलन: डॉ.अविनाश काशीद .पुसेसावळी